गुमास्ता लायसेन्स म्हणजे काय ?

What is gumasta license : Know important details explain in marathi

गुमास्ता परवाना Gumasta License

तुम्ही जर व्यवसाय सुरु करणार असाल किंवा व्यवसाय सुरु केला असेल तर तुम्हाला गुमास्ता नोंदणी किंवा Gumasta License या कागतपत्र विषयी एकदा तरी मनात विचार आला असेल. आपल्या व्यवसाय साठी गुमास्ता का महत्वाचा आहे , आणि गुमास्ता म्हणजे नेमकं काय आणि गुमास्ता नोंदणी चे फायदे काय आहेत आज आपण तेच जाणून घेऊ.

महाराष्ट्र राज्यामध्ये जर एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय सुरु करू इच्छित असेल किंवा एखाद्या व्यक्तीने आपला व्यवसाय सुरु केला असेल तर अशा व्यवसायाची महाराष्ट्र शासन ला माहिती असावी म्हणून गुमास्ता नोंदणी करावी लागते. महाराष्ट्र राज्यात सुरु असेलेल्या व्यवसायाचे सरकार जवळ तपशील असावा आणि प्रत्येक व्यवसाय ला त्याचा नोंदणी क्रमांक मिळावा जेणेकरून व्यवहार हे पारदर्शक होण्यासाठी गुमास्ता नोंदणी महत्वाची ठरते. गुमास्ता नोंदणी मध्ये व्यवसाय धारकाला आपल्या व्यवसायाचे नाव, व्यवसायच पत्ता , व्यवसाय बद्दल थोडक्यात माहिती आणि व्यवसाय मध्ये काम करत असेलेल्या कामगारांचा तपशील शासनाजवळ द्यावा लागतो. गुमास्ता नोंदणी द्वारे व्यवसायबद्दल ची महत्वाची माहिती शासन आपल्या जवळ जमा करते.

गुमास्ता परवाना म्हणजे काय ?

आपण सुरु करत असलेल्या किंवा सुरु केलेल्या व्यवसायाची शासनाला माहिती देऊन शासनाच्या कामगार विभाग मध्ये आपल्या व्यवसायाची नोंद करून संबंधित व्यवसाय चालू ठेवण्याची अनुमती मिळवणे म्हणजेच गुमास्ता परवाना होय. गुमास्ता परवाना मध्ये आपल्याला एक प्रमाणपात्र दिले जाते त्याला नमुना ग किंवा नमुना ब असे देखील म्हणतात. गुमास्ता परवाना प्रमाणपत्र मध्ये आपल्या व्यवसायाचे नाव, व्यवसाय मालकाचे नाव, व्यवसायाचा पत्ता आणि व्यवसाय मध्ये काम करत असेलेल्या कामगारांचा तपशील दिलेला असतो. गुमास्ता परवाना प्रमाणपत्र आपल्यला व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी लावणे गरजेचेच असते.

व्यवसायाची गुमास्ता नोंदणी हे महाराष्ट शासनाच्या कामगार विभाग अंतर्गत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरी व सेवाशर्तीचे विनियमन ) नियम २०१८ च्या कायद्या नुसार केली जाते. 

तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत असाल जसे कि , तुमचे एखादे किरकोळ विक्रीचे दुकान असे, तुम्ही एखादे छोटे उपहार गृह चालवत असाल, किंवा तुम्ही तुमचा मोठा निर्मिती उद्योग सुरु करत असाल अशा सर्व प्रकारच्या व्यवसायांना गुमास्ता नोंदणी करून Gumasta License अर्थात गुमास्ता परवाना घ्यावाच लागतो. जर एखादी व्यक्ती किंवा संस्था नोंदणी न करता व्यवसाय चालवत असेल तर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरी व सेवाशर्तीचे विनियमन ) नियम २०१८, अंतर्गत संबंधित व्यक्ती किंवा संस्था वर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. 

गुमास्ता परवाना मिळवणे अनिवार्य आहे का ?

हो, तुम्ही कोणत्याही प्रकार चा व्यवसाय करत असाल तुम्हाला गुमास्ता नोंदणी करून गुमास्ता परवाना मिळवणे अनिवार्य आहे. तुमचा एखादा स्टार्ट अप व्यवसाय असेल, तुमच्या इथे शून्य कामगार असतील किंवा संध्या तुम्ही घरून व्यवसाय चालवत असाल अशा सर्व परिस्तिथी मध्ये देखील तुम्हाला गुमास्ता परवाना मिळवणे बंधन कारक आहे. एखाद्या व्यासाचा गुमास्ता परवाना मिळवणे हे त्या व्यवसायसाठीच एक महत्वाची गोष्ट असते कारण याच परवण्याचा उपयोग व्यवसाय मध्ये बऱ्याच ठिकाणी केला जातो आणि जर तुमच्या जवळ गुमास्ता परवाना असेल तर तुमचा व्यवसाय हा अधिकृत नोंदणी झालेला असतो आणि याचा फायदा ग्राहक मध्ये विश्वास मिळाव्यात होतोच तसेच इतर व्यवसाय सोबत व्यवहार करताना देखील आपल्या व्यवसायाची विश्वासाहर्ता दाखवण्यात उपयुक्त ठरतो 

महाराष्ट्र राज्य च्या ई प्रशासन धोरणानुसार गुमास्ता नोंदणी साठी शासनाने ई प्रणाली अवलंबली आहे. गुमास्ता परवानासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवले जातात अर्ज करते वेळी लागणारी सर्व कागतपत्रे ऑनलाईन पद्धतीनेच जमा करावी लागतात. अर्ज हा अधिकार्यांद्वारे ऑनलाईन पडताळणी करून आपल्याला Gumasta License म्हणजेच गुमास्ता परवाना ऑनलाईन पद्धतीने आपल्या इमेल वर पाठवला जातो.

गुमास्ता परवाना बद्दल असणारे इतर काही महत्वाचे प्रश्न आपण थोड्यात जाणून घेऊयात 

हो, जर तुम्ही तुमच्या घरूनच व्यवसाय सुरु करत असाल तरीही तुम्ही गुमास्ता परवाना मिळवू शकता. जर तुम्ही एखाद्य सोसायटी मध्ये राहत असाल तर अर्ज करते वेळी तुम्ही सोसायटी चे NOC ( ना हरकत ) घेऊन अर्जसोबत सादर करू शकता. जर तुम्ही स्वतःचे वेगळे घर असेल तर तुम्हाला कोणत्याच NOC ची गरज नाही.

जर काम करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०-९ दरम्यान असेल तर गुमास्ता परवाना तुम्ही एका दिवसात मिळवू शकता. जर काम करणाऱ्या व्यक्तीची संख्या १० किंवा १०  पेक्षा जास्त असेल तर परवाना मिळवण्यासाठी १० ते १४ दिवस पर्यंत वेळ लागू शकतो.

२०१८ नंतर जर गुमास्ता नोंदणी केली असेल तर तुम्हाला गुमास्ता नूतनीकरण करण्याची गरज नाहीये. परंतु जर तुम्ही २०१८आधी गुमास्ता परवाना मिळवला असेल तर तुम्हाला तो नूतनीकरण करून घ्यावा लागेल आणि या नूतनीकरण नंतर परत नूतनीकरण करण्याची गरज राहणार नाही

२०१८ नंतर मिळणारे सर्व गुमास्ता परवाने हे आयुष्यभरासाठी वैध आहेत. जोवर तुम्ही व्यवसाय करत आहेत तोवर तुमचा गुमास्ता परवाना वैध राहील.

हो, एखादी व्यक्ती जर एकापेक्षा जास्त व्यवसाय करत असेल तर ती व्यक्ती आपल्या नावावर दोन्ही व्यवसायाचे दोन वेगळे परवाने घेऊ शकते

हो, जर तुमचा एक व्यवसाय असेल पण तो दोन वेग वेगळ्या ठिकाणी त्याची ऑफिस किंवा युनिट असतील तर तुम्हाला प्रत्येक ऑफिस किंवा युनिट साठी स्वतंत्र अशी गुमास्ता परवाना नोंदणी करावी लागेल. प्रत्येक युनिट मध्ये मिळवलेला परवाना त्या जागी लावावा लागेल

हो, जर तुम्ही व्यवसाय बंद केला असेल तर तुम्ही गुमास्ता रद्द करण्यासाठी अर्ज करू शकता आणि तुमचा गुमास्ता परवाना रद्द करून घेऊ शकता.

हो, जर तुम्हाला गुमास्ता परवाना मध्ये व्यवसायाचे नाव , व्यवसायच पत्ता , व्यवसायमध्ये काम करत असेलेल्या लोकांचा तपशील अशा गोष्टींमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही अर्ज करून गुमास्ता परवाना मध्ये बदल करून घेऊ शकता.

नाही, महाराष्ट्र शासनाच्या ई शासन धोरण नुसार गुमास्ता परवाना चा अर्ज हा ऑनलाईन प्रकियेद्वारे भरावा लागतो आणि व्यवसायसंबंधी कागतपत्रे ऑनलाईन जमा होतात. त्या सर्व कागतपत्राची पडताळणी पण ऑनलाईनच होते. म्हणून गुमास्ता परवानासाठी अधिकाऱ्याची पडताळणीसाठी व्यवसाय जागी येत नाहीत.